गणेशबागेतील विहिरी
गुरुभक्तीत रंगलेले ब्राह्मण, गणेश बागेतील विहिरीचे पाणी गुरु प्रतिपदेच्या समाराधनेसाठी नेत असताना घडलेले आक्रित.
अक्कलकोटास प्रतिवर्षी माघ वद्य प्रतिपदेस नृसिंह सरस्वतींच्या पुण्यतिथीचा उत्सव नृसिंहोत्सव म्हणून साजरा होत असे. या तिथीस गुरुप्रतिपदा संबोधले जाते. एके वर्षी या दिवसात पाण्याचा दुष्काळ पडला. गुरुप्रतिपदेच्या उत्सवाचे वेळी पाच सहाशे स्त्रीपुरुष उपस्थित होते. भोजनाची व्यवस्था सुरु होती. पाण्याची व्यवस्था केशव रामचंद्र देशपांडे यांचेवर होती. उत्सवासाठी उपस्थित भाविकांना पिण्यासाठी तसेच स्वयंपाकासाठी पुष्कळ पाण्याची गरज होती. आजुबाजूच्या विहीरींचे पाणी कमी पडले म्हणून गणेशबागेकडील विहीरींचे पाणी आणण्याची योजना ठरली. केशव देशपांडे यांनी चार तगडे बैल जोडून दोन बैलगाड्या जुंपल्या आणि तीन ब्राह्मणांना मदतीसाठी घेऊन ते तिथे गेले. चौघांनी मिळून पाणी शेंदून तांब्या पितळेचे मोठ मोठाले सत्तर रांजण पाणी शेंदून भरले. जुन्या काळच्या लोकांची ताकद अचाट, शरीरयष्टी भवकम हे हांडे दोन बैलगाड्यांमध्ये हारीने रचले. तर डोंगर वाटावा अशी ती हांड्यांची उतरंड, बैलगाडीत रचली होती. श्रीगुरुंचा उत्सव आणि त्यासाठी ही जलव्यवस्था सुरु होती. आता वेळ दवडून चालणार नव्हते. दोन गाड्यांवर एकेक ब्राह्मण चढला आणि बैलांचा कासरा हातात घेऊन त्यांनी गाड्या हाकल्या. बैलांना हे ओझे बहाणे कष्टदायक होते तरीही ते कसे बसे चालत होते. थोड्या अंतरावर गेल्यावर बैलांच्या मानेवरील जोखड तुटले. आणि काही कळायच्या आत असत्याचे नसते झाले. बैलगाडी उलटली आणि पाण्याने तुडुंब भरलेले ते अवजड रांजण ब्राह्मणाच्या अंगावर पडले. एकच ओरडा झाला. हांड्यांखाली चिरडलेल्या ब्राह्मणांचे काय झाले असेल या विचाराने सारे भयग्रस्त झाले. उपस्थितांनी गाडी नीट उभी करून, पाण्याचे हांडे बाजूला करून त्याखाली निपचीत पडलेल्या ब्राह्मणांना बाहेर काढले. श्रींच्या कृपेने ते वाचले. केशव देशपांडे आणि अन्य ब्राह्मणांनी हिंमत हारली नाही. पुन्हा पाणी शेंदून, समाराधनेच्या जागी धाव घेतली. गणेशबागेतील विहिरीपासून फर्लांगभर अंतरावर ही दुर्घटना घडली. विहीरीपासून मुख्य रस्त्याकडे चढण्यापूर्वीच गाडी उलटली. शेतातील खडबडीत दगडांचा मार्ग. बैल भितीने पळून गेले. श्रींच्या कृपेने कार्य निर्विघ्न पार पडले. परंतु पाण्याचे रांजण एकमेकांवर आपटून त्यांची दुर्दशा कशी झाली त्याचे वर्णन वामनबुवांनी गुरुलीलामृतात केले आहे. ते म्हणतात, दोन घागरींचे झाले कानवले, तीन भांड्याचे बसले गळे, लोखंडी घटांचे पोट फुटले. वूड ड़पले कित्येकांचे, भांड्यात उडला हाहाकार, मनुष्यांसही पडला दुर्धर प्रसंग, वृषभ भिऊन बुजले पळती दूर, विप्र थरथर कांपती. ही गणेशवाग, सोलापूर एम. एस. इ. बी.च्या सब स्टेशनजवळ, दानेश्वरी पेट्रोल पंपाच्या अलिकडे उजव्या बाजूस आहे. खासबागेकडून इथे येण्यास पायवाट आहे. या विहीरीवर एक प्राचीन तुळशी वृंदावन आहे. १९५४ साली ही बाग सुभाप शरणप्पा आडवितो त्यांनी पस्तीस हजार रुपये देऊन खरेदी केली. पस्तीस एकराच्या या शेतजमिनीची मालकी सध्या त्यांचेकडे आहे. पूर्वी याठिकाणी डाळिंब आणि पेरुच्या बागा होत्या. आता अन्य उत्पादन निघते.