स्वामींनी राजवाड्याच्या तटावरून उडी घेतली.

श्रीस्वामी समर्थ महाराज अनंत कोटी ब्रह्मांडनायक असल्याचा प्रत्यय देणारी एक अजब घटना याच जुन्या राजवाड्यात घडली. जगाचा उद्धार करण्यासाठी सगुण अवतार धारण केलेल्या सर्वज्ञ सर्वसाक्षी श्रीस्वामीरायांनी राजवाड्याच्या तटावरून उडी मारून आपल्या भक्तास दर्शन दिले. जुन्या राजवाड्याची ती भिंत आजही त्याची साक्ष देत उभी आहे. गवतवत्सल श्रीस्वामीरायांनी राजवाड्याबाहेर उडी घेतली ती पुण्याच्या बिडकर महाराजांना दर्शन देण्यासाठी. त्याची हकिगत थोडवयात अशी आहे…

रामचंद्र बळवंत उर्फ रामानंद बिडकर हे निजामाच्या एका सरदार घराण्यात १८३२ साली जन्मलेले देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण धट्टीकट्टी शरीरयष्टी, मोहक चेहरा, पाणीदार डोळे असलेले रामचंद्र हे कट्टर हनुमानभवत्त. वयाच्या बाराव्या वर्षी त्यांनी पंढरीची वारी केली. त्यावेळी त्यांस पांडुरंगाचे दर्शन घडले. वणीच्या सप्तशृंगीच्या दर्शनास गेले असता, देवीच्या मुखातील त्रयोदशगुणी विडा त्यांचे हातावर पडून आदिशक्तीची कृपा झाली. मोठे झाल्यावर काही काळ त्यांनी कोर्टात नोकरी केली. त्यानंतर सुगंधी द्रव्याचा व्यापार केला. पुण्याच्या मंडईत कवड्या विकल्या. कर्ज काढून सराफींचा व्यवसाय केला. पुढे कल्याण येथे एका अवलियाची गाठ पडून त्यांना किमया विद्या प्राप्त झाली. यातून अमाप पैसा मिळाला. सर्व प्रकारचे सुखोपभोग, ऐशोआराम भोगले. इतके की कालांतराने या ऐहिक सुखाचा त्यांना वीट आला. त्यातील फोलपणा प्रत्ययास. देहप्रारब्धानुसार छंदीफंदी जीणे जगले परंतु अंतरंगातील भक्तीभावाच्या गंगेने अशी उसळी गारली की अविनाशी सुखाच्या शोधार्थ ते साधुसंत अवलिया यांच्या गाठीभेटी घेत राहिले. त्यापैकी एकाने त्याला फटकारले. ‘तुम्ही नुसता पैसा मिळवून ऐशोआराम करावा. तुमच्याने कराला परमार्थ होणार. त्यासाठी अंगी वैराग्य वाणले पाहिजे. त्या साधुचे हे शब्द बिडकरांना जिव्हारी लागले. त्यानंतर खरे अविनाशी सुख भी मिळवीनच, अशी प्रतिज्ञा करून त्यांनी आपले उपास्य देवतांची आराधना सुरु केली. एकेकाळी इंद्रियजन्य सुखासाठी आसुसलेले त्यांचे मन आता वैराग्याच्या दिशेने वाटचाल करू लागले. प्रपंचापेक्षा परमार्थच गोड वाटू लागला. ते रात्रंदिवस सद्गुरु भजनात रंगून गेले. हनुमान कवचाचे अकरा पाठ केल्याशिवाय ते अन्नग्रहण करीत नसत. अशी अनेक महिन्यांची कडक उपासना केल्यावर मारुतीराय प्रसन्न झाले आणि अक्कलकोटास जाऊन श्रीस्वामी समर्थांचे दर्शन में अशी आज्ञा दिली. हनुमंतांची आज्ञा शिरसावंद्य मानून तहानभूक हरपलेल्या रामचंद्र बिडकरांना प्रभू रामरायांचे दर्शन घडले आणि ते रामानंद झाले. त्यांनी अक्कलकोटास धाव घेतली. गीच राम होतो, गीच कृष्ण होतो अशी ग्वाही देणाऱ्या श्रीस्वामी समर्थांच्या दर्शनासाठी ते व्याकुळ झाले होते. आपल्या हृदयातील राम अक्कलकोट  येथे सगुण रुपात वावरतो आहे, तेव्हा या स्वामीरायाचे झाल्याखेरीज अन्नग्रहण करणार नाही असा त्यांनी निग्रह केला. पेठेतल्या आप्पासाहेब शेरखाने यांच्या घरी ते मुक्कामास राहिले. हा तुमचा निश्रय टिकणे शक्य नाही कारण सध्या श्रीस्वामी महाराज नुकतेच राजवाड्यात गेले आहेत आणि एकदा ते राजवाडयात गेले की पंधरा पंधरा दिवस राजवाड्याबाहेर पडत नाहीत, त्यामुळे आपण आपला निग्रह सोडावा असे अणासाहेबांनी त्यांना सांगितले. परंतु, रामानंद बिडकर आपल्या निश्वयापासून तीळमात्र ढळले नाहीत. असा एक दिवस गेला, रात्र गेली आणि दोन दिवसानंतर एवं अतवर्य घडते. श्रीस्वामी महाराजांनी राजवाड्यात दंगा सुरु केला. ‘हमारेकू बंदीखाने में डालते है, लोगोंके तकलीफ होती है, दर्शन नही मिलते।’ असे म्हणत महाराज अस्वस्थ झाले. बरोबरच्या सर्व मंडळींचा त्यांनी उद्धार सुरु केला. राजवाड्याची द्वारे उघडण्याचे काही नियम असतात. शिपाई स्वत: च्या मर्जीने दरवाजे उघडू शकत नाहीत. राजेसाहेबांना वर्दी देऊन, त्यांची अनुमती घेऊन त्वरीत महाद्वार उघडावे, असा निर्णय सर्वानुमते ठरला. विनिमय झाला. पण तोवर महाराज कसले थांबतात! ते कुणाचे तावेदार थोडेच होते. भिंतीवरून एकदम खाली उडी मारून ते राजवाड्याच्याबाहेर पसार झाले. दर्शनासाठी ताटकळत असलेल्या लोकांना त्यांनी दर्शन दिले. इकडे अप्पासाहेबांना महाराज पन्नास फूट उंच भिंतीवरून तडक उडी टाकून राजवाड्याच्या बाहेर आले आहेत ही बातमी समजली. धावत येऊन त्यांनी बिडकरांना आपण दर्शनास चलावे असे सांगितले. रामानंदांनी भक्तीभावाने स्वामीरायांचे दर्शन घेतले, विधीवत पाद्यपूजा केली आणि महाराजांची त्यांचेवर कृपा झाली. जुन्या राजवाड्याच्या डाव्या बाजूकडील मूदपाकखान्याच्या खिडक्यांकडील भिंतीची उंची सोळा फूटांहून अधिक आहे. श्रीस्वामी समर्थ महाराज प्रज्ञापुरीस दाखल झाले त्यावेळी त्यांचे वय मोठे असून त्यांची काया जीर्ण झाली होती. अशा स्थितीत महाराजांनी तटाच्या भिंतीवरून घेतलेली उडी ही त्यांच्या भक्तवत्सल भक्ताभिमानीत्वाची साक्षच नव्हे काय?