शेख नुरुद्दिन दर्गा

वटवृक्ष मंदिराच्या नैऋत्येस पाच मिनिटांवर मुरलीधर मंदिराकडून डाव्या बाजूला थोड्या उंचीवर, अक्कलकोटच्या वेशीजवळ हा दर्गा आहे. तेथे शेखनुरुद्दीनबाबा व त्यांचा एक हिंदू बालशिष्य कुलकर्णी अशा दोघांच्या कबरी आहेत. दर्ग्याभोवती शेखनूरवावांच्या आप्तेष्टांच्या कवरी आहेत. दर्ग्याच्या चुडा महाद्वारातून आत प्रवेश करताच समोरच बाबांच्या बहिणीची कबर आहे. या कबरीवर कुमारीका मुली विवाहासाठी नवस बोलतात व विवाहोत्तर हिरवा बांधून नवस फेडतात. हिंदू मुस्लिम भाविक आपल्या अडलेल्या कामांकरीता शेखनूर साहेबांना नवस बोलतात आणि कार्यसिध्दीनंतर किन्नर, वाघ वा अन्य प्राण्यांचे बळी न देता, या प्राण्यांची चित्रे भिंतीवरती काढून नवस फेडला जातो. इथे असलेला एक छोटासा दगड हातात धरून मन्नत मागतात. मन्नत पूर्ण होणार असेल तरच हा दगड उचलला जातो. अन्यथा तो जमिनीस चिकटून राहतो असा भाविकांचा विश्वास आहे.

 

वास्तविक हे स्थान सातशे वर्षांपूर्वीचे आहे. श्रीस्वामी समर्थ महाराज या दर्ग्यावर येऊन शेखनूर बाबांशी बोलत बसत. महाराज दर्ग्यासमोर बसायचे ती शिळा आजही तिथे दाखवली जाते. मुळात हे स्थान हिंदू संत श्रीशेषनारायण यांचे असून, यवनी आक्रमणानंतर ते त्यांच्या ताब्यात गेले. दर्ग्याची व्यवस्था सांभाळणाऱ्या मौलवी बाबांकडून एक हकीगत सांगितली जाते ती अशी. अक्कलकोट गावातील कुलकर्ण्यांची एक ब्राह्मण स्त्री अनेक वर्षे विनाअपत्य होती. तिने आपली व्यथा शेखनुरुद्दिन बाबांना सांगितली. त्यावर तुला दोन मुलगे होतील पैकी पहिला मुलगा मला द्यावा लागेल, या अटीवर बाबांनी तिचे मनोरथ पूर्ण केले. बाबांच्या कृपेने तिला मुलगा झाला, पण मातृत्व तो मुलगा बाबांना देण्यास धजावत नव्हते. पुढे लवकरच तिला दुसरा मुलगा झाला. पण तो जन्मतःच पांगळा होता. आपण बाबांची आज्ञा पाळली नाही, त्यामुळेच हे दुर्दैव ओढवले, याची तिला कल्पना आली. तिने शक्कल लढवली. पहिल्या गोंडस मुलाऐवजी बाबांना हा पांगळा मुलगाच अर्पण करावा, तो पहिला की दुसरा हे बाबांना कसे कळणार? असा विचार करून ती पांगळ्या मुलास घेऊन बाबांकडे पोहोचली. पण इकडे घरी एकच आकांत उडाला. घरी असलेल्या तिच्या मोठ्या मुलावर एका मांजरीने झडप घातली व पंजाने त्याचे डोळे फोडले. चेहरा विद्रूप केला. आंधळा होऊन रक्तबंबाळ स्थितीत तो बेशुध्द पडला. त्या बाईस हे वृत्त समजताच ती घरी आली आणि तशाच स्थितीत त्याला घेऊन ती बाबांकडे गेली. बांनी विदारक स्थितीतील त्या मुलाला आपल्याजवळ घेतले आणि आत जे मठीत घेऊन गेले ते परत वर आलेच नाहीत. त्या दोघांनी तिथेच समाधी घेतली. त्या दोघांच्याही कबरी आपणास दर्ग्यासमोर पहावयास मिळतात. या स्थानावर स्त्रियांना प्रवेश नाही. त्यांना दूरूनच दर्शन घ्यावे लागते.

औरंगजेब अक्कलकोट परगण्यात आला तेव्हा तब्बल तीन महिने त्याचा मुक्काम या शेषनारायण समाधीच्या माळावर होता. कारण हा परिसर नागणहळ्ळी गावाचाच एक भाग आहे. तिथे नव्वद फूट उंचीचे टोलेजंग नागनाथ मंदिर होते. संक्रांतीचे वेळी या मंदिरावर सूर्यकिरण लंबरेषेत पडू लागले की या मंदिराची सावली संपूर्ण अक्कलकोटावर पडायची इतके ते मंदिर अतिभव्य होते, असे सांगितले जाते. औरंगजेबाच्या आक्रमणात हिंदूंचे नागणहळ्ळीचे हे शिवमंदिर उद्धवस्त केले गेले. येथील हिंदूंनी मंदिरातील शिवलिंग वळसंगजवळील दिंडूर येथे प्रतिष्ठापित केले. मंदिराच्या दगडांचा वापर शेषनारायण समाधीसाठी केला गेला, तेच हे स्थान शेखनुरुद्दिन नावाने आज प्रचलित आहे. मंदिराच्या चारही दिशांस असलेले हिंदू मंदिराचे खांब, कट्ट्याच्या दर्शनी बाजूस असलेले गायवासराचे चित्र आणि समाधी स्थानावर प्रज्ज्वलित असलेला गोड्यातेलाचा अखंड नंदादीप हे हिंदू संस्कृतीचे निदर्शक आहेत. टेकडीच्या डाव्या बाजूला एका हत्तीची छोटी घुमटी दिसते. हा हत्ती माजारीपर्यंत पोहोचला की कयामत होणार असे यवनांचे म्हणणे आहे. हे स्थान ब्रह्मानंद नामे एका योग्याची परंपरा दर्शवित असून, ब्रह्मस्वरूप अनंत चैतन्य संप्रदायाचे ते आद्य स्थान असावे. काही सांप्रदायिक साधू आजही कधीतरी अचानक उत्तररात्री या स्थानावर येतात, असे आजूबाजूचे लोक सांगतात. खांद्यावरील झोळीतील शिधासामग्री एकत्र करून खालच्या बाजूस स्वयंपाक करून भोजन करतात. पहाटे अडीच तीनच्या सुमारास वटवृक्ष देवस्थानात जाऊन स्वामी महाराजांना भेटून दर्शन करतात. अश्विनकुमार नामक एक साधु कधीतरी इथे येतात. ते कोण आहेत कुठून येतात, हे समजत नाही. शेखनूर समाधीसमोर अरेबिक भाषेत एक शिलालेख सापडतो, त्याचे वाचन झाल्यास या स्थानावर प्रकाश पडू शकतो. श्रीस्वामी समर्थ महाराजांचे या स्थानाशी जिव्हाळ्याचे संबंध होते. महाराज समाधीस्थानातील योग्याबरोबर तासन्तास बोलत असत. महाराज राजवाड्यात असत त्यावेळी, डाव्या बाजूच्या बुरुजावर उभे राहून समोरील शेखनूर समाधीच्या पुरुषाशी सांकेतिक भाषेत बोलत असत. या स्थानासंदर्भात अक्कलकोटमधील बुजुर्ग लोक अनेक प्रकारच्या आख्यायिका सांगतात. परंतु, श्रीस्वामी महाराजांचे अक्कलकोट येथील बावीस वर्षांच्या कालखंडात इथे होत असलेले येणे-जाणे आणि तासन् तास बसणे, बोलणे यावरून या स्थानाचे माहात्म्य निश्चितच थोर आहे. हे स्थान हिंदूंचे की मुसलमानांचे या फंदात श्रीस्वामी महाराज कधी पडले नाहीत.

 

स्वामी महाराजांनी येथील मुस्लिम लोकांची फजिती उडवली तो स्वामी चरित्रांमधून येत असलेला प्रसंग याच दर्ग्यावर घडला. एके वर्षी चैत्र महिन्याच्या ‘भरदोन प्रहरी महाराज वटवृक्ष स्थानाहून उठले आणि पायात जोडा घालून तरातरा चालत दर्ग्यालगत असलेल्या मुसलमानांच्या कब्रस्तानाकडे आले. त्यांच्या ‘मागोमाग असंख्य सेवेकरी आणि भक्तमंडळीही धावत तिथे पोचली. एक भलामोठा दगड महाराजांनी अनेक लोकांकडून तेथे आणवला. तिथल्या टाकला. जवळच्याच कबरीवर महाराजांनी लघवी केली आणि तिथेच बाजूला शौचास बसले. महाराजांचे हे विपरीत कृत्य पाहून उपस्थित मुसलमान खवळले. गावात जाऊन आपल्या जमातीतील बड्या लोकांस तिथे पाचारण केले. हातात दांडकी आणि अन्य शस्त्रे घेऊन पन्नास शंभर मुसलमान महाराजांच्या दिशेने धावत आले. श्रीमहाराजांना हे अपेक्षितच होते. बोकड व मोत्या नावाचे दोन भले थोरले कुत्रे त्यावेळी महाराजांबरोबर होते. महाराजांनी आपले गुडघे जमिनावर टेकून हाताने जमिनीवर दाबल्याची खूण केली आणि श्रीपाद भटजींना ‘बोकडकू दाबो बोकडकू दावो…’ अशी आज्ञा केली. बुध्दिमान भटजींना महाराजांचा कृतीचा अर्थ क्षणात ध्यानी आला आणि त्यांनी कुत्र्याचे मुस्कट जमिनीवर दाबून धरले. त्यासरशी गावात यवनांच्या घरी हलकल्लोळ उडाला. जे यवन महाराजांना मारण्यासाठी धावून आले होते त्यांच्या घरातील लहान मुलांच्या पोटात एकाएकी दुखू लागले आणि ती मुले कुत्र्याप्रमाणे भुंकत सैरावैरा पळू लागली. त्यामुळे बायाबापड्या आक्रोश करू लागल्या. आपल्या घरातील कर्ते पुरुष महाराजांना मारावयास गेले म्हणूनच हा प्रकार उद्भवला असे एका वृध्द यवनाने त्यांना समजावले. मारेकरी मुसलमानांना घरी घडलेले हे अतवर्य समजले, त्यावेळी हातातील शस्त्रे टाकून ते महाराजांना शरण आले. श्रींसमोर लोटांगण घालून क्षमायाचना करू लागले. भवतवत्सल महाराजांनी श्रीपाद भटजींना कुत्र्यास सोडावे असे सांगितले. त्याप्रमाणे जमिनीवर दाबून धरलेले कुत्र्याचे मस्तक सोडताच तिकडे भुंकणारी यवन मुले एकदम शांत झाली. श्रीस्वामी समर्थ महाराज हे अवलिया आहेत हे त्यावेळी मुसलमानांनी मान्य केले आणि ते त्यांच्या ‘गजनी लागले.