शेखनूर तळे तथा हत्ती तलाव

थडगी मळ्याच्या मागे असलेला भव्य तलाव हत्ती तलाव म्हणून प्रसिध्द आहे. १८७६ च्या दुष्काळाचे काळात याची निर्मिती झाली. श्रींनी सहा महिन्यापूर्वीच आधी विहिरी पाहून या तळी पाहून या अशी आज्ञा केली होती. महाराजांच्या बोलण्याचा अर्थ पुढे दुष्काळ पडला तेव्हा ध्यानी आला. अक्कलकोटास शेखर दर्याच्या पायथ्याशी असलेल्या या तळ्याचे बांधकाम सुरु झाले. गोरगरिबांना अन्न न मिळाल्यामुळे त्यांचे पोषणार्थ सहा-सात भल्या थोरल्या विहिरीचा ऐवज असलेले हे भव्य तळे खोदायला सुरुवात झाली. भोसलेराजे या दुष्काळाशी जमेल तसा सामना करीत होते. राजघराण्यामार्फत रोज हारेच्या हारे भरून भाकल्या व भाजी तयार होऊन इथे येत असे. श्रीमहाराज स्वहस्ते भाकर तुकडा वाढून उर्वरित अन्नदान दरबारचे सेवक व कारकून करीत असा उपक्रम १८७७ साली वर्षभर सुरु होता. शेकडो लोक या तव्यावर काम करून पोट भरू लागले. पुण्यनगरीतील एक पुण्यात्मा मोरोप्पा शेट वाळेकर याच काळात श्रींच्या दर्शनास आले त्यावेळी या तळ्याच्या काठी दगडी कठड्यावर महाराज बसले होते. येथे मोठी यात्रा भरणार असे ते पूर्वीपासूनच म्हणत होते. मुकेल्या तहानलेल्या मजुरांची चरितार्थासाठी इथे यात्रा भरत असे. याचवेळी पाणी विका, पाणी विका अशी आज्ञा श्रींनी मोरोप्पांना केली होती. त्याचा अर्थ पुण्याला परतल्यावर त्यांना उलगडला. पुणे जिल्ह्यात पडलेल्या दुष्काळाचे वेळी सरकारमार्फत पुअर हाऊस स्थापन करून अन्नदान होत होते. पण लोकांना पिण्यासाठी पाणी नव्हते. मोगेण्णा शेटनी पाच-पन्नास माणसे कामास लावून पुण्यनगरीतील जेवढे आड-विहिरी व जलाशय होते त्याचे पाणी शेंदून बैलगाडीच्या सार्पन मोठमोठे रांजण भरून गल्लीगल्ली पाणपोया स्थापन केल्या. सुमारे वर्षभर ही सेवा विनामुल्य करून त्यांनी श्रींचे आशीर्वाद मिळवले. थडगीबागेत राजांचे बैठकीचे स्थान म्हणून संगमरवरी बांधणीचा प्रशस्त असा सदा मंडप आहे. आजही तो सुस्थितीत असून राजघराण्यातील व्यक्तींच्या मृत्युनंतर तेरा दिवसांत जे अंत्यविधी-त्याप्रित्यर्थ धर्मकार्य तसेच शोकसभा, दणदान विधी यासाठी याची उभारणी अवकलकोट संस्थानमार्फत केली गेली आहे. इथून पुढे गेल्यावर मोठे तळे लागते. या तळ्याच्या बाजूने आता बायपास रोड गेला आहे. हत्ती तलाव म्हणून हे तळे प्रसिध्द असले तरी शेखनूर दर्ग्याच्या तळाशी असल्यामुळे त्यास खनूर तलाव असेही म्हणतात. अक्कलकोटमधील सर्व गणपतींचे विसर्जन याच तळ्यात होते.