राजवाड्यालगतचे श्रीगणेश मंदिर तथा चार देवळी पंचायतन

अक्कलकोटच्या जुन्या राजवाड्यानजिक शहाजी वाचनालयासमोर हे संस्थानकांचे प्रशस्त असे गणेश मंदिर आहे. पंचायतनातील मूर्ती दाक्षिणात्य धर्तीच्या व अप्रतिम कोरीव काम असलेल्या आढळतात. काळ्या पाषाणातील श्रींची मूर्ती आणि श्रीगणेश पंचायतनातील शिव, सूर्य, शक्ति आणि विष्णू यांच्या मूर्तीही अत्यंत विलोभनीय आहेत. अक्कलकोटच्या संस्थानिकांचे हे मंदिर. सध्या हे मंदिर मोडकळीस आले असून मंदिराचे गर्भगृह तेवढे शाबूत आहे. आपल्या राज्यामध्ये एक महान साधु आले आहेत. त्यांच्या दर्शनाला अलोट गर्दी झाली आहे हे वृत्त कर्णोपकर्णी मालोजीराजेंच्या कानावर गेले. मालोजीराजे हे धार्मिक वृत्तीचे होतेच. त्यांनाही दर्शनाची उत्कटता लागली. सेवकांना बोलावून तपास केला असता हे साधु आपल्याच गणेश मंदिरात उतरले आहेत असे त्यांना कळले. हे साधु जर खरे असतील तर आत्ताच्या आत्ता इथे आपणास दर्शन देतील असा विचार त्यांच्या मनात उद्भवला त्याचक्षणी महाराज दिगंबर अवस्थेत राजवाड्यात दत्त म्हणून उभे ठाकले. मालोजीराजे विस्मयचकित झाले आणि दाजीबा भोसलेंसह ते गणपती मंदिरात दाखल झाले आणि पाहातात तो काही क्षणांपूर्वी आपणास राजवाड्यात दर्शन देणारे ते हेच यतिवर्य आहेत, याची त्यांना खात्री पटली. राजांनी पुष्पमाला व श्रीफल अर्पण करून त्यांना मन:पूर्वक वंदन केले. समर्थांनी तेच श्रीफल मालोजीराजेंच्या हाती ठेवून त्यांना आध्यात्मिक ठेव दिली आणि जवळ असलेले काषायवस्त्र मालोजीराजेंच्या अंगावर फेकून हे वैभव कधीतरी सरणार त्यामुळे त्यागवृत्तीने राज्यशकट चालवावा असा संकेत दिला. तर पुष्पमाला संस्थानचे खाजगी कारभारी दाजीवाराजे भोसले यांच्या गळ्यात घातली कारण अनेक स्वातंत्र्ययोद्ध्यांशी दाजीवांचा अंतस्थ संबंध होता है महाराज जाणून होते आणि त्या कार्याला मूक संमती म्हणून महाराजांनी दाजीवांचा सन्मान केला. श्रीमंत मालोजीराजे आणि श्रींची प्रथम भेट या गणरायांसमोरच घडली. हे मंदिर आतून अत्यंत प्रशस्त असून एकेकाळचे वैभव मात्र आता उरलेले नाही.

 

प्रारंभीच्या काळात असलेल्या या गणेश मंदिराच्या पूजेअर्चेसाठी मैंदर्गीच्या भट जोशी यांची नियुक्ती केली होती. हे जोशी घराणे पुढे अक्कलकोटला बाले वर्गीहून आलेले म्हणून मैंदर्गीकर हेच त्यांचे उपनाम म्हणून रूढ झाले. लक्ष्मण भटजी मैंदर्गीकर श्रींच्या उपासनेत आणि धर्मकार्यात इतके एकरूप झाले होते की, अनेक वर्षे या मंदिराची आणि गणरायांची निरलसपणे सेवा करून एके दिवशी या गणरायांच्यासमोर माथा टेकवला आणि तिथेच गतप्राण झाले. कुटुंबिय मंडळी विलंब झाल्यामुळे शोधाशोध करीत मंदिरात आली त्यावेळी गणरायासमोर त्यांचा निश्रेष्ट झालेला देह पाहून कष्टी झाले आणि पुढे त्यांचे पार्थिव स्वगृही नेऊन पुढील क्रियाकर्म करण्यात आले. श्रीमहाराजांच्या या मंदिरात अनेकदा येणे-जाणे व विश्राम घडला आहे. गांचा वाडा अक्कलकोटात असून, ज्या कट्ट्यावर महाराज बसत असत तो औदुंबर आजही तिथे उभा आहे.

क्यूँजी, हमारे डाळिंब ला देना 

 

याच गणेश मंदिरात एक दिवस श्रीस्वामींची स्वारी स्नान करून पलंगावर विराजमान झाली होती. मुंबईची काही मंडळी तिथे दर्शनास आली असता त्यातील एका व्यापायास श्रीमहाराज म्हणाले क्यूँजी, हमारे डाळिंब ला देव… हे ऐकून ते चकीत झाला. कारण काही दिवसांपूर्वी आपले एक काम झाले तर श्रींना दोन डाव घेऊन जाण्याचा त्यांनी नवस केला होता व तो फेडण्यासाठीच तो अक्कलकोटला आला होता. पण दर्शनाला येण्याच्या घाई गडबडीन तो डाव आणायला विसरला. श्रींच्या या उद्गारांनी तो लगबगीने तिथून उठला आणि बिन्हाडी जाऊन ती डाळिंबे आणून त्यांनी श्रीचरणी अर्पण केली. सुंदराबाई तिथेच बसल्या होत्या. श्रीमहाराजांपुढे ठेवलेली दोन्ही डाळिंबे फोडून त्यातील दाणे ती आपल्या नातवास खाऊ घालू लागली. त्यातील खाली जमिनीवर पडलेले दागे एकत्र करून ती महाराजांना ‘मरवत होती. ब्रह्मनिष्ठ वामनबुवा आणि रामदासीबुवा हे त्यावेळी तिथे उपस्थित होते. हे कृत्य पाहून त्यांना अतिशय राग आला आणि दोघेही बाईना मारण्यास धावले. पण श्रींनी त्यांना तिथेच थांबवले, अरे थांबा, शेतात जसे काळेपांढरे बुजगावणे पाखर सिण्यासाठी ठेवतात त्यातलेच है मडके आहे, पायपोस मारुन काढून देऊ. हे श्रीमुखातील शांत व सबुरीचे विधान ऐकून दोघेही खाली बसले. पुढे काही महिन्यातच विष्णुपंत ऑडकरांच्या वाडयात बसले असता, अधिकाराने वर्चस्व गाजवणाऱ्या सुंदराबाईस महाराजांनी दूर केले. या मंदिरातील दूर गणेशनसमोर उघडयावर एक मलामीठा गाईच्या आकारा एवटा डंदिरमामा दोन्ही हातात लाडू पकडून तो खाण्यात गर्क असलेला दिसतो. काव्या आडात कोरलेली ही मव्य सुवकपूर्ती खरोखरच आकर्षक आहे. गणेशासमवेत मंदिरा-भोवताली शिव, सूर्य, जगदंबा आणि विष्णू यांच्या छोटयाशा पण सुबक मूर्ती चार बाजूस चार छोटया देवळांमध्ये स्थापन केल्या आहेत. म्हणूनच या मंदिरास चार देवळी श्रीगणेश पंचायतन असे म्हणतात.

आज क्षिप्रा चांगली झाली होती 

 

अहमदनगर जिल्यातील विश्वकर्मा नामक एक कमेदी ब्राह्मण सपत्नीक अवकल्कोटास आला. महाराज त्यावेळी याच गणपती मंदिरात मुक्कामास होते. स्वामीची पूजा, आरती करून माझी गरीबाची पुडी मान्य करावी असे म्हणताच, श्री प्रसन्नपणे उत्तरले, तुझी पुडी मान्य, घरी जाऊन आमचेसाठी भजी, कडबोळी आणि आमटी तयार कर, महाराजांचे हे बोल ऐकून ती श्रध्दावान ब्राह्मण कमालीचा सुखावला, आपल्या बिहाडी येऊन पत्नीकडून महाराजांसाठी सोवळ्या संपूर्ण स्वयंपाक करवून घेतला, त्यानंतर त्याने श्रींचे, स्वतःचे व पत्नीचे अशी तीन ताटे तयार केली. पैकी स्वामीरायांसाठीचे नेवेद्याचे ताट घेऊन ती घराबाहेर पडणार इतक्यात दारावर दोन ब्राह्मण आहे आणि मुकेले आहोत आम्हास भोजन यावे अशी याचना करू लागले, विश्वकर्याने स्वतःचे व पत्नीसाठी वाकले ताट त्यांच्यापुढे केले, दोघेही यथेच्छ भोजन करून निघून गेले. स्वामीरायांना नैवेद्य दाखवायला विलंब होतोय याची जाणीव होती. म्हणून लग्ने निवाले असता आणखी एक छुथार्थ विप्र दारात दत्त म्हणून उसा राहिला. अभिजीने अन्नाची याचना करू लागला, विश्वकर्मा दयाळू होता. व्याला खरी मानवता काय ती कळली होती. त्याने क्षणाचाही विलंब न लावता त्या विप्रास घरात बोलावून स्वामीरायांचे ताट त्यास अर्पण केले. तृप्तीची टेकर देव, या धमन अन्नाची ददात पडणार नाही असा आशीर्वाद देऊन निघून गेला, तीन ब्राह्मण अतिथी म्हणून आर्ट आणि तृप्त होऊन गेले, पण महाराजांना नैवेद्य देना आला नाही याचे शल्य त्याला बाँचू लागले, महाराजांचे चरणी धाव घेत तो कळवळून क्षमा याचना करू लागला. यावर त्यास प्रेमाने उलीन प्रसन्नवदन सर्वमाश्री स्वामीराय त्यास म्हणाले, आज शिप्रा (आमटी) चांगली झाली होती. परंतु वेलदोडे फार झाले, होळगी छान बनवली. मनी आयामी, परंतु, कडबोळ्यात मिरचीने पडका केला, तथापि, स्वादिष्ट आमटीची शाबास…

 

स्वत:च्या वर्ग सिध्द केलेल्या स्वयंपाकाचे महाराजांनी केलेले वर्णन ऐकून तो समजून चुकला, श्रीस्वामीरायांनी आपला नैवेध त्या तीन अतिथीच्या कपात येऊन ‘मक्षण केन्या, यापेक्षा अधिक आपणास काय हवे? स्वामींचा जयजयकार करीत तो व त्याची पत्नी कृपांकित होऊन नगर येथे स्वग्रामी परतली, छ्यापीडितास अन्नदान हे मानवी जीवनाचे कर्तव्य आहे, समोवर कोणत्याही रूपाने आपल्या दारी येतो. त्यामुळे कुणालाही स्थित हस्ताने परत धाडू.

. ་་་་་་ ་་་་ vo ནད་ 6 ?

१३

 

चावडी समोरील मुलुख मुजुमदार वाडा 

 

छत्रपती शाहूंच्या काळात तब्बल १२० गावांचे मिळून बनलेले अक्कलकोट संस्थान हे निजामशाही आणि आदिलशाहीच्या सीमांना भिडलेले होते. त्यामुळे शत्रूपासून कायमचे संरक्षण व्हावे म्हणून अक्कलकोट गाव तळात वसवून, त्याच्या सभोवती मजबूत तटबंदी उभारण्यात आली. प्रसिध्द थोरली आणि धाकटी अशा टोलेजंग रणनवरे अशा वेशी ह्या त्याचवेळी उभारण्यात आल्या. इंगळे, गुर्जर, शिर्के, बावणे, खंडागळे, काटकर, महापराक्रमी सरदारांच्या नेतृत्वाखाली संस्थानकडून मोठी फौज उभारून मोगली आक्रमणाला प्रथम पायबंद

(Image on Top Left Side/Right Side)

 

घालण्यात आला. त्यानंतर महाराष्ट्रासहीत सोलापूर आणि कर्नाटकातील अनेक प्रांतातील मातब्बर पाटील, कुलकर्णी, देशमुख, देशपांडे अशा वतनदारांशी सलगी करून त्यांच्या बुद्धिमत्तेचा आणि कर्तृत्वाचा लाभ अक्कलकोट संस्थानला मिळाव यासाठी, त्यांना विशेष सवलती व मरातब देऊन मोठ्या हुद्द्यांवर त्यांच्या नेमणुका केल्या. यातच वर्णी लागली ती हन्नूरच्या पाटील घराण्याची. हन्नूरला पाटील, कुंभारीला देसाई, कणमसला देसाई या नावाने प्रसिध्द असलेले हे घराणे अक्कलकोटचे मुजुमदार झाले. अक्कलकोट येथे चावडीसमोर मुजुमदारांचा लांबलचक दुपाखी वाडा असून १९७४ पासून या वाड्याची वहिवाट सरदेशमुखांकडे आहे.

 

१८५६ साली अक्कलकोट येथे आल्याच्या तिसऱ्याच दिवशी श्रीमहाराज नारायण कोंडोपंत मुजुमदार यांच्या वाड्यात चोळाप्पासहीत दाखल झाले. अक्कलकोटचे हे मुलुख मुजुमदार. कर्नाटकातील हन्नूरचे पाटील. कानडी भाषिक देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण. पिढीजात सोळा गावांची वतनदारी असलेल्या या कुटुंबाला अठराव्या शतकाच्या पूर्वार्धात अक्कलकोट सरकारकडून मुजुमदारीची सनद मिळाली. त्यानंतर अक्कलकोटच्या चावडीसमोर प्रशस्त, लांबलचकक कविपंत असा वाडा बांधला आणि मुलुख मुजुमदारीचा कारभार पाहू लागले. त्यावेळी नारायण कोंडोजी, त्यांचे पुत्र देवाजीपंत आणि विठ्ठल, पोरपा, पायलापा, आणि सखाराम असे पाच नातू वास्तव्यास होते. महाराज मुजुमदारांकडे आल्यावर दूध मागत असत. त्यामुळे महाराजांसाठी रोज एक दीड लिटर दूध तापवून तयार ठेवलेले असायचे. त्यासाठी मुजुमदारांनी दोन गायी घेतल्या होत्या. रुप्याच्या ग्लासमधून त्यांना दूध दिले जाई. महाराजांची योग्यता ओळखून तिथे त्यांची पाद्यपूजा, आरती करून अनेकदा उपस्थितांना प्रसाद भोजन दिले जायचे. मुजुमदारींच्या अफाट व्यापात अनेकदा महाराजांशी सल्लामसलत ही होत असे. महाराजांनी या कुटुंबाला अष्टकोनी, शुद्ध स्फटिकाची एक माळ आणि श्रीगुरुचरित्राची पोथी प्रसाद म्हणून दिली होती. पंढरीनाथांचे चिरंजीव सखाराम यांचा जन्म १८६७चा. यांना बालपणी स्वामींचे दर्शन आणि सहवास घडला होता. अॅडव्होकेट सखारामपंत हे मराठवाडा, गुलबर्गा, हैद्राबाद येथे सरकारी वकील म्हणून कार्यरत होते. १९१५ नंतर ते अक्कलकोट येथे पुत्र बाळकृष्ण आणि दोन कन्यांसहीत स्वग्गृही वास्तव्यास आले. चिरंजीव बाळकृष्ण सखाराम तथा दादासाहेब यांचा जन्म १९२० साली अक्कलकोट येथेच झाला. १९३९ साली मंगळवेढ्याच्या स्वामीभक्त गुरुनाथ जोशी यांच्या जेष्ठ कन्येशी त्यांचा विवाह झाला. त्यानंतर सहा वर्षे ते अक्कलकोट येथे सहकुटुंब वास्तव्यास होते.

पुढे संस्थाने खालसा झाली. संस्थानकडून मिळणारी आठशेची तैनात आणि मुजुमदारी गेली. बऱ्याचशा वतनी जमिनी कुळ कायद्यात गेल्या. वयोवृद्ध दादासाहेबांनी श्रींचे निरंतर वास्तव्य घडलेला गतकालीन वैभवाचा एकमेव साक्षीदार असलेला आपला वाडा सरदेशमुखांना बहाल केला. अखेरपर्यंत ते स्वामी सेवेत राहिले. त्यांच्या पत्नी श्रीमती ताई मुजुमदार या ८६ वर्षांपर्यंत पुण्यातील दत्तवाडीत स्वत: च्या कैवल्यं या वास्तूत स्वामीभक्तीत लीन होत्या. श्रीमहाराजांकडून प्राप्त झालेले श्रीगुरुचरित्र त्यांनी लॅमिनेशन करून ठेवले आहे. तसेच स्वामीराय दूध प्यायचे तो रुप्याचा पेला, स्फटिकाची माळ, त्या काळातील असंख्य मोठमोठी भांडीकुंडी आणि एकेकाळच्या मुजुमदारीच्या सनदांचे प्राचीन दस्तऐवज सांभाळीत बालपणापासूनच्या स्वामीरायांच्या आठवणी आणि अनुभूती स्मरत पुणे येथे शेकडो लोकांना स्वामीमहती पटवीत होत्या. ताईना सासरी आणि माहेरी दोन्हीकडे श्रींचे सान्निध्य मिळाले. वयाच्या तेराव्या वर्षी मंगळवेढा येथे श्रींचे प्रथम दर्शन घडले. त्यानंतर गेली पाऊणशे वर्षे त्या स्वामीरायांच्या कृपाछत्राच्या छायेत निरंतर होत्या. शेवटचा मराठा सरदार बापू गोखले यांना १८१८ च्या आष्टीच्या लढाईत जखमी झाले असता श्रीस्वामी महाराजांनी त्यांना मंगळवेढ्याच्या कोटात आणून ठेवले. लढाईचे वेळी तोफेच्या समोर न रहाता तोफेच्या खाली लप असा इशारा स्वामींनी वापूंना दिला होता, त्यामुळेच आष्टीच्या युद्धात ते वाचले. मंगळवेढ्याच्या मंगलभूमीत, तेथील भुईकोटात श्रींचे अक्षय वास्तव्य आहे. असे ताई सांगत असत. ताईंचे माहेर तिथलेच. श्रीमहाराज ज्या ओट्यावर बसत तिथे ताईना त्यांचे दर्शन घडायचे. मी आता खरंच म्हातारा झालो आहे. या कट्ट्यावर वसलो आहे. कट्टा बुजायला लागला आहे असे ‘म्हातारा” मला सांगत असतो असे ताई म्हणायच्या. मुजुमदारांचे वंशज मात्र १९४५ नंतर धंदा उद्योगाच्या निमित्ताने पुणे, वरंगळ, हैद्राबाद या गावी स्थायिक झाले. मागील पिढीतील वंशज श्रीमतीताई मुजुमदार नुकत्याच स्वामीचरणी लीन झाल्या.