नाना रेखींनी स्वामींची कुंडली इथेच मांडली
ब्रहासमंधाने पिडलेले आणि क्षयाने खंगलेले हैद्राबादच्या निजाम सरकारचे दफ्तरदार श्रीमंत शंकरराव राजे रायरायन समर्थ दर्शनास अवकलकोटास आले. त्यावेळी स्वामी महाराज याच दर्ग्याच्या कब्रस्तानातील खळग्यात निजले आणि शंकररावांचा मृत्यु चुकवला. ती कथा राजेराय रायन मठाच्या माहितीत आम्ही सविस्तर दिली आहे. श्रीस्वामी महाराजांचे प्रकटीकरण श्रीआनंदनाथांच्या मते चैत्र शुध्द द्वितीया शके ३४० म्हणजेच सन ४१८ तर श्रीस्वामीसुतांच्या म्हणण्यानुसार हस्तिनापुर नजीकच्या हेली मदतया १७१ सन ११९ मध्ये झाले. या दोन्ही वर्णनात चैत्र शुद्ध द्वितीया ही तिथी मात्र एकच असून, त्यादिवशीच आजही महाराजांची जयंती साजरी होते. श्रीस्वामीसुत महाराजांनी दर्शविलेल्या सन १९४९ चैत्र शुद्ध द्वितीया या तिमीवर स्वामी महाराजांनी शिक्कामोर्तब केले. नगरच्या नाना देखींनी श्रींची कुंडली मांडली, तो प्रसंग यान शेख सुरुद्दीन दम्पति पडला. स्वामीसुतांच्या आज्ञेनुसार स्वतः नाना देखी अक्कलकोट येथे आले. त्यावेळी महाराज कंजळकरांच्या वाड्यातील वडाखाली खाटल्यावर पहुडले होते. नाना त्यांस लोटांगण घालून हात जोडून पुढे उभे राहताच महाराज काहीही न बोलता तिथून उठले आणि नूरबाबांच्या दर्यावर गेले. नानासहित इतर मंडळी महाराजांच्या मागोमाग लगोलग तिथे पोचली. घोड्याच वेळात तिथे कीतर्नाचा कार्यक्रम सुरु झाला पण तत्पूर्वी नानांनी स्वत: बनवलेली श्रीमहाराजांची कुंडली त्यांना अर्पण केली. श्रीमहाराजांनी कुंडली भी गुंडाळी जवळच्याच माळदरीवर विली. कीर्तनाचा कार्यक्रम संपल्यावर एका सेवेकऱ्यास बोलवून महाराजांनी ती कुंडली माळदरीवरून खाली काढण्यास सांगितले. त्यानंतर श्रीमहाराजांनी स्वत: त्यावर अक्षता आणि हळदकुंकू वाहिले. खट्टू झालेले नाना रेखी (Right Side Top Image)
महाराजांच्या या कृतीने प्रसन्न झाले. आपण केलेल्या कुंडलीची श्रीमहाराजांनी दखल घेतली. यामुळे ते भरून पावले. इतक्यात त्यांच्याकडे अंगुलीनिर्देश करीत श्रीमहाराज गरजले. ‘अरे देखता क्या है? नगारा बजाओ…’ महाराजांचे हे फर्मान ऐकून नाना उत्साहाने बेभान होऊन नगारा वाजवू लागले. थोड्या वेळाने महाराजांनी त्यांना जवळ बोलावले आणि उजवा हात पुढे करण्यास सांगितले. आम्ही तुमच्या हातावर आता आत्मलिंग देतो, असे म्हणून श्रीमहाराजांनी आपला पंजा नानांच्या हातावर ठेवला, त्यासरशी नानांच्या हातावर निळसर रंगाचे विष्णुपद उमटले. अशा तऱ्हेने नाना रेखींनी श्रींना अर्पण केलेली कुंडली आणि त्यावर श्रीमहाराजांनी केलेले शिक्कामोर्तब हा दिव्य प्रसंग शेखनूर दर्ग्यावरच घडला. गावाच्या वेशीवर असलेले हे स्थान अतिशय शांत आणि निसर्गरम्य आहे. तिथे स्वामी महाराज बसत असत शिळा आजही आपणास पहावयास मिळते. श्रींच्या सांगण्यावरून नानांनी जो नगारा बडवला तो ही दयांच्या उजव्या बाजूस भंगलेल्या स्थितीत आपणास पहावयास मिळतो. शेख नूरुद्दिन दर्ग्याचे हे स्थान आजही यवनांच्याच ताब्यात आहे. इस्लामी सफर महिन्यात या क्षेत्री मोठा उत्सव म्हणजेच उरुस असतो. १६ व १७ तारखेला मोठी यात्रा भरते. पहिल्या दिवशी गंध लेपन होऊन दुसऱ्या दिवशी दीपोत्सव म्हणजेच चिरागा होतो. या उत्सवाचा प्रथम मान अक्कलकोटच्या कुलकर्ण्यांचा असून यावेळी फकिरांना महाप्रसाद म्हणजेच खाना दिला जातो.