थडगीबागेतील दूधबावडी
अवकलकोटमधील श्रींची वास्तव्य स्थळे आपण पहात आहोत. अक्कलकोट मधील ज्या दुपाखी – तीपाखी वाडयात श्रींची येजा असायची. त्या वाडयातील परसात त्या कुटुंबाच्या मालकीचे आड किया विहिरी आहेतच. कुंभार आळीतील पटवर्धनांच्या गणपती मंदिराच्या मागे गोठी विहीर आहे. लंडुरेबुवांच्या गळ्यात, बाळकृष्णबुवा ग्रामजोशी, ओंडकर, हर्डीकर, गेंदर्गीकर या सर्वांच्या परसात स्वतःच्या मालकीच्या विहीरी होत्या. शेखनूर दर्ग्याजवळील मोठे तळे. ज्याच्या एका बाजूस हत्तींना पाणी पिण्यासाठी सोय होती म्हणून त्यास हत्ती तलाव म्हणतात. ते तळे म्हणजे सात विहीरींचा जथा आहे. गाम हत्ती तलावाच्या एका बाजूस, रानबाभुळीच्या घनदाट छायेत विसावलेली एक अजस्त्र विहीर आहे. ही विहिर रुंद व खोल असून या दूधबावडीत अक्कलकोटच्या चार-पाच पिढवा पोहल्या आहेत. सराटयाच्या रानातून दबक्या पावलाने मार्ग काढत या दूधबावडी पर्यंत जाता येते. ही विहीर पहायला एकटगा दुकटगाने जाऊ नये. अवकलकोटमधील तरुण मुले या रानात शिरून नको ते उद्योग सर्रास करीत असतात. पूर्वी वापरात होती तेव्हा ही दूधबावडी स्वच्छ दुधाळ होती. कालांतराने तिचे काठी दशक्रिया विधी होत असत. पण पुढे पुढे त्याचा दुरुपयोग होऊ लागला. तेथील आडोशाचा फायदा घेऊन गैरव्यवहार होऊ लागले. त्यामुळे काठभा लावून दूधबावडी परिसर बंद करण्यात आला आहे.