अक्कलकोटचे कुलकर्णी
शेषनारायण स्वामींचे बालशिष्य कुलकर्णी यांचे वंशज आजही अक्कलकोटात आहेत. त्यांची चौदावी पिढी आज अक्कलकोटात विद्यमान आहे. मांजरीने रक्तबंबाळ केलेल्या मुलाचे नाव कमारसपंत कुलकर्णी असे होते. समाधीत गुप्त झालेले बाळ म्हणजेच कमारसपंत असून, त्यांचे धाकटे बंधू जे जन्मत: पांगळे त्यांचे पुत्र खळोपंत यांना होने त्यांचे नाव मयात्सपंत. या दोघांचे आजोबा खेवजीपंत. हे अक्कलकोटचे कुलकर्णी. तेच या घराण्याचे ज्ञात मूळ पुरुष. शेषनारायण महाराजांच्या कृपेने दोन पुत्र झाले. ज्यांची कथा आपण वर वाचली आहे. कुलकर्णी घराणे हे हरितस्य गोत्री देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण. कमारसपंत 글 गुप्त झाले. त्यांचे धाकटे बंधु मयारसपंत यांचा वंश पुढे वाढला. रामचंद्र, भवानराव आणि नारायण असे तीन पुत्र आज विद्यमान असून या सर्वांना मुलगे आहेत. हेच कुलकण्यांचे विद्यमान वंशज. गेल्या चौदा पिढ्यात या घराण्यात सतत पुत्ररत्नच जन्माला येत असून आताच्या पिढीतही या घराण्यात आठदहा पुरुष आहेत. कुलदेवता चंद्रला परमेश्वरीची उदंड कृपा आणि समाधी पुरुषाचाही वरदहस्त या कुटुंबावर असल्याचे हे निदर्शक आहे. श्री शेषनारायण व त्यांचा बालशिष्य कुलकर्णी यांची ही गुरुशिष्याची जोडगोळी दर्ग्याच्या परिसरात फिरताना अनेकांनी पाहिली आहे. एका प्रत्यक्षदर्शी चित्रकाराने त्या बरहुकूम चित्र रेखाटले आहे. शेख नुरुद्दीन या नावाने ओळखले जाणारे मूळ पुरुष हे नागेश संप्रदायी शेषनारायण स्वामी चारशे वर्षांपूर्वी या स्थळी देहधारी होते. परंपरेतील स्थानावर नसरुदिन बादशाह की दो चराहो दिन अशी आरोळी देण्याची पद्धत आहे. त्यानंतर हरबोला शिव हर हर असा गजर केला जातो. कालांतराने नागेश संप्रदायाची जी स्थाने यवनांच्या कब्जात गेली त्यावेळी हर बोला हर हा गजर त्यातून वगळून शेख नसरुद्दिन याच नावाची आरोळी होते. शेख नसरुद्दिन या मुस्लिम सम्राटाचे राज्य सातशे वर्षांपूर्वी दिल्लीत होते. तो अत्यंत धार्मिक असून श्री. नागेश यांचा परमभक्त होता. त्याची गुरुभक्ती इतकी जाज्ज्वल्य होती की त्याने आपले दिल्लीचे समस्त वतन आपल्या गुरुंचे चरणी समर्पित केले होते. त्याच्या या गुरुभक्तीची मिसाल म्हणून श्री. नागेश संप्रदायात श्रीगुरु शिवनागेशांच्या जयजयकाराच्या आधी शेख नसरुद्दिन यांचे नाव सन्मानाने घेतले जाते. हेच नाव अक्कलकोटात आजही आरोळीच्या वेळी उच्चारले जाते.