English मराठी

राजा फत्तेहसिंह महल, अक्कलकोट

अक्कलकोटच्या इतिहास आणि सांस्कृतिक सोहळ्यात स्वतःला मग्न करा. एक प्रेक्षापूर्ण वातावरणात, जिथे भूतकाळ आणि वर्तमान भेटते आणि प्रत्येक पाऊल एक काळाची यात्रा आहे.
राज्यकारभार  : श्रीमंत मालोजीराजे III संयुक्ताराजे भोसले अक्कलकोट
वंशावळ पहा

अक्कलकोटचा संक्षिप्त इतिहास

अक्कलकोट राजघराण्याचा इतिहास १७व्या शतकापासून सुरु होतो. छत्रपती शाहू महाराज, १६८२ मध्ये जन्मले, हे महान छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू होते, छत्रपती शाहूराजेंचे जीवन मुघलांच्या कब्जेत, राजकीय कुशलक्षमतेत आणि मराठा राजांच्या सिंहासनासाठी अथक संघर्षात उलगडले.

रायगड किल्ल्याच्या पतनानंतर, शाहूराजे आणि त्यांच्या आई मुघलांच्या कैदखान्यात होते, ज्यामुळे मुघलांच्या कैदखाण्यात शाहूराजांच्या संगोपनाची सुरुवात झाली. त्यांच्या कारावासाच्या काळात, मुघल सम्राटाने शाहूराजे यांच्या दूध आणि अन्नाच्या खर्चांसाठी अक्कलकोट परगणा जागीर म्हणून दिली. तेव्हा ते फक्त दहा वर्षांचे होते.अक्कलकोट राज्य पहिले मुघलांचे होते पण त्यांनी ते शाहूराजांना दिल्याने ते मराठा साम्राज्यात आले.

१७०७ मध्ये छत्रपती शाहूराजे मुक्त झाले, १७०७ मध्ये औरंगाबाद येथे औरंगजेबच्या मृत्यूनंतर प्रिन्स आझमने जुल्फिकार खानच्या सल्ल्यानुसार हा निर्णय घेतला, हा एक महत्त्वपूर्ण वळण होते. राजकीय प्रतीकांसह, मराठा पहारेकरी आणि अनेक डेक्कन सुबहांवर महसूल गोळा करण्याचे अधिकार देऊन, छत्रपती शाहूराजे आपल्या योग्य हक्काच्या स्थानी परत येण्यासाठी प्रवासाला निघाले. १७०८ मध्ये छत्रपती शाहूराजे औपचारिकपणे मराठा राजसिंहासनावर आरुढ झाले, त्यांची राजधानी सातारा होती.

महाराज छत्रपती शाहुराजेंनी त्यांची पहिली मोहीम पारूड या ठिकाणी केली. मुघलांविरुद्ध या मराठ्यांच्या गृहयुद्धादरम्यान, मुघल लष्करीचे सरदार श्री सयाजी लोखंडे पाटील यांनी छत्रपती महाराज शाहूराजेंवर हल्ला केला. महाराज शाहूराजेंने सयाजी लोखंडे आणि त्याचे कुटुंबाचे बहुतेक पुरुषसदस्यांना मारून टाकले. सयाजी लोखंडे यांचा मुलगा राणोजी लोखंडेला त्यांच्या आईने छत्रपती शाहू महाराजांच्या चरणी फेकले. श्री सयाजी लोखंडे यांच्या विधवा व पुत्राचा वध करून महाराज छत्रपती शाहुराजे लोखंडे पाटील कुळाचा सहजपणे नाश करू शकत होते, मात्र त्यांनी राणोजीला आपल्या कुटुंबात सामावून घेतले. महाराज शाहुराजे यांनी ही मोहीम जिंकली म्हणून राणोजींचे नाव फत्तेसिंहराजे  ठेवले. नंतर त्यांनी फत्तेसिंहराजे यांना औपचारिकपणे दत्तक घेतले. फत्तेहसिंहराजेंने साताऱ्यात राहून त्यांचे शिक्षण केले. त्यांनी महाराज छत्रपती शाहूराजे यांना डेक्कनच्या पठारावरील सर्व मोहिमांमध्ये मदत केली. त्यांने मुघलांकडून रायगड किल्ला पुन्हा जिंकला आणि तो मराठा साम्राज्यात परत आणला.

महाराज शाहूराजे यांनी १७०७ आणि १७०८ च्या दरम्यान आकलकोट आणि सावंतवाडी संस्थानांची स्थापना केली. अक्कलकोट राज्यात राज्य करण्यासाठी त्यांना विश्वासू व्यक्ती हवी होते, फत्तेहसिंहराजे हे त्यांचे पहिले दत्तक व ज्येष्ठ पुत्र असल्यामुळे त्यांनी फत्तेसिंहराजे यांचा राज्याभिषेक करून त्यांना अक्कलकोटचे राजसाहेब बनवले. ही अक्कलकोट वंशाची सुरुवात होती.

तथापि, महाराज छत्रपती शाहूराजे यांनी सातारा राज्याच्या गादीसाठी दुसरा मुलगा दत्तक घेतला आणि त्यांचे राजराम दुसरे म्हणून नामकरण केले, त्यांला रामराजा असेही म्हणतात. महाराज छत्रपती शाहूराजे यांच्या मृत्यूनंतर, महाराज राजाराम द्वितीय यांचा सातारा राज्याच्या महाराज म्हणून राज्याभिषेक झाला. ते श्रीमंत फत्तेसिंहराजे यांच्यापेक्षा वयाने लहान होते आणि त्यामुळे महाराज फत्तेसिंहराजे त्यांच्यासोबत साताऱ्यात राहण्यास अस्वस्थ होते. साताऱ्यापेक्षा अक्कलकोटमध्ये आपले हित अधिक चांगले जपले जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे त्यांनी सातारा कायमचा सोडून अक्कलकोट येथे आयुष्यातील शेवटचे दिवस घालवण्याचा निर्णय घेतला. श्रीमंत फतेहसिंहराजे यांनी १७५१ मध्ये अक्कलकोट राज्यावर आपले नियंत्रण प्रस्थापित केले. राज्यात क्रमसंबंधानुसार व्यवस्था स्थापित करून लगेचच त्यांनी श्री राम मंदिर, ‘फतेह बाग’ आणि ‘महादेव तळे’ बांधण्यास सुरुवात केली.

श्रीमंत फत्तेसिंहराजे पहिले यांना दोन बायका होते परंतु त्यांना कोणतेही संतान नव्हते. नंतर, १७५५ साली, त्यांनी आपल्या आत्मवंशीय बंधू श्री बाबाजी लोखंडे यांच्याकडून बाबासाहेबांना दत्तक घेतले त्यांचे नाव शहाजी पहिले ठेवले. या दत्तक प्रक्रियेदरम्यान श्रीमंत फत्तेसिंहराजे पहिले यांनी त्यांचे बंधू श्री बाबाजी लोखंडे यांना सोलापूर जिल्ह्यातील पिलीव हे शहर बहाल करून त्यांना जागीरदारीची हक्की दिली व त्यांना जहागीरदार ही पदवी दिली. अशा प्रकारे पिलीव घराणे अक्कलकोट राजघराण्याची एक शाखा आहे.

श्रीमंत शहाजीराजे पहिले, १७६० मध्ये अक्कलकोट राज्याच्या गादीवर बसले आणि अक्कलकोटचे राजसाहेब झाले. त्यांनी बांधलेली प्रसिद्ध "शहागंज" बाग आजही अस्तित्वात आहे. त्यांना दोन मुले होते. मोठ्या मुलाचे नाव फतेहसिंहराजे आणि धाकट्या मुलाचे नाव तुळाजीराजे होते, नंतर तुळाजीराजेंना सातारा जिल्ह्यातील राजाचे कुर्ले नावाचे गावात मजबुतीकरण्यास पाठवण्यात आले, आणि हे गाव त्यांना जहागीर म्हणून देण्यात आले. त्यांचे आडनाव भोसले वरून राजे भोंसले असे बदलण्यात आले. अशा प्रकारे कुर्ला राजे भोंसले घराणे अक्कलकोट राजघराण्याची एक शाखा आहे. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे जेष्ठ पुत्र श्रीमंत फतेहसिंहराजे ll अक्कलकोटचे राजेसाहेब झाले, ते अक्कलकोटच्या गादीवर बसणारे तिसरे व्यक्ती होते.

श्रीमंत फत्तेसिंहराजे दुसरे यांच्या मृत्यूनंतर त्यांचे चिरंजीव श्रीमंत मालोजीराजे दुसरे यांचा अक्कलकोटचे राजेसाहेब म्हणून राज्याभिषेक झाला. ते राज्य करत असताना कंपनीची नियम झाला. त्यांचे निधन झाले तेव्हा ते अवघे २५ वर्षांचे होते.

श्रीमंत मालोजीराजे II यांच्या मृत्यूनंतर, त्यांचे पुत्र श्रीमंत शहाजीराजे II सत्तेवर आले आणि ते अक्कलकोटचे राजेसाहेब झाले. राज्याचे कारभार ब्रिटिश राजवटीच्या शासनाखाली सुरू झाले. सामान्यपणे प्रशासन चांगले होते. त्यांनी लोकांच्या हिताकडे लक्ष दिले आणि कृषी व व्यापाराला प्रोत्साहन केले.

श्रीमंत शहाजीराजे II यांच्या मृत्यूनंतर त्यांचे पुत्र श्रीमंत मालोजीराजे II गादीवर बसले आणि अक्कलकोटचे राजेसाहेब झाले. त्या काळात, श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटला आले. श्रीमंत मालोजीराजे II यांना श्री स्वामी समर्थ महाराजांना भेटण्याचे सौभाग्य मिळाले आणि महाराजांची त्यांच्यावर कृपा झाली.

श्रीमंत महाराज मालोजीराजे II यांना दोनच मुली होत्या, त्यांना मुलगा नव्हता. पुत्राच्या इच्छेने त्यांनी स्वामी समर्थांची प्रार्थना केली. स्वामी समर्थांनी त्यांला आशीर्वाद देऊन महणाले, 'होय, मुलगा होईल.' श्रीगुरुमुखांचे ते शब्द ऐकून सर्वांना आनंद झाला. १५ डिसेंबर १८६७ रोजी श्री मालोजीराजे यांना पुत्रप्राप्ती झाली, ज्याचे नाव पुढे श्री शहाजीराजे असे ठेवण्यात आले.

श्रीमंत महाराज मालोजीराजे II यांच्या मृत्यूनंतर त्यांचे अल्पवयीन पुत्र श्रीमंत शहाजीराजे III हे गादीवर बसले आणि अक्कलकोटचे राजेसाहेब झाले. श्रीमंत महाराज शहाजीराजे III यांनी अतिशय प्रशंसनीय कार्य केले. एकही मुले शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी त्यांनी प्राथमिक शाळांची स्थापना केली. या सर्व शाळा सेंट्रल स्कूल म्हणून ओळखल्या जाणार्या इमारतीने जोडल्या गेल्या. आजही केंद्रीय शाळेत विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यांना पुढील शिक्षणही उपलब्ध करून दिले. उच्च माध्यमिक शिक्षणासाठी अक्कलकोटच्या मध्यभगी राजवाड्याजवळ भव्य इमारत बांधण्यात आली. या शाळेला ‘श्री शहाजी हायस्कूल’ असे नाव देण्यात आले आहे.

श्रीमंत शहाजीराजे तिसरे यांच्या मृत्यूनंतर राजघराण्याचा वारस नव्हता. त्यामुळे राजमाता लक्ष्मीबाई यांनी मुलगा दत्तक घेण्यास ठरवले. १८९८ मध्ये, त्यांनी कुर्ला राजे भोंसले कुटुंबातील श्री गणपतीराजे भोंसले यांचा जेष्ठ मुलगा दत्तक घेतला आणि त्याचे नाव फत्तेसिंह तिसरे ठेवले.

२० ऑगस्ट १९१६ रोजी श्रीमंत फत्तेसिंहराजे गादीवर बसले आणि अक्कलकोटचे राजेसाहेब झाले. त्यांनी पाहणी केली आणि नवीन राजवाडा बांधण्याची कल्पना मांडली. त्यानंतर त्यांनी आपल्या देखरेखीखाली शहराबाहेर नवीन राजवाडा बांधण्यास सुरुवात केली. हा राजवाडा डोरिक आणि कोरिंथियन स्थापत्य शैलीचे उदाहरण आहे. या राजवाड्याला "फत्तेसिंह महल" म्हणतात. हे १९२५ मध्ये पूर्ण झाले होते. या राजवाड्याच्या मागे, शाही पाहुण्यांसाठी सर्व सोयीसुविधांनी सुशोभित असलेला, आलिशान उत्तराभिमुख बंगला बांधण्यात आले होते. राजवाड्याला शोभिवंत दिसण्यासाठी पांढऱ्या रंगात रंगवलेला आहे.

पहिल्या महायुद्धाच्या वेळी श्रीमंत फत्तेसिंहराजे भोसले यांनी सर्व राज्याचे प्रमुखांना नेते म्हणून मार्गदर्शन केले. त्यांच्या ह्या असाधारण योगदानाची दखल घेत किंग जॉर्ज पंचम यांनी १९१८ मध्ये त्यांना 'ऑनररी कॅप्टन' ही पदवी देऊन सन्मानित केले. आशिया खंडातील आतापर्यंतचा सर्वात मोठा एक-पुरुष द्वारा निर्मित शस्त्रागार संग्रह असण्याची ख्याती त्यांना दिली जाते. या शस्त्रागार संग्रहालयात ऐतिहासिक लष्करी साहित्य आहे. अभ्यासक, इतिहासकार आणि पर्यटकांच्या दृष्टीकोनातून हा एक मौल्यवान खजिना आहे.

श्रीमंत फत्तेसिंहराजे तिसरे यांच्या मृत्यूनंतर त्यांचे जेष्ठ पुत्र श्रीमंत विजयसिंहराजे ३ एप्रिल १९२३ रोजी गादीवर आरुढ झाले. ते तरुण असताना त्यांच्या पूज्य आई अक्ककोटचे श्रीमंत ताराबाई राजमाता यांनी १९२३ ते १९२३ पर्यंत राज्यकर्ते म्हणून कुशलतेने राज्य केले. त्यामुळे, ब्रिटिशानी त्यांना सर्वोत्तम प्रशासक म्हणून 'कैसर-ए-हिंद' ही पदवी बहाल केली.

श्रीमंत विजयसिंहराजे राजसाहेब, अक्कलकोट यांनी शस्त्रागार संग्रहालयात स्वतः शिकार केलेल्या वाघ, बिबट्या, काळवीट, रानडुक्कर, अस्वल, हरिण आणि सांबर यांसारख्या वन्य प्राण्यांच्या टॅक्सीडर्मीं साठा करून शस्त्रागार संग्रहालयात भर केली अर्थात प्राण्यांचे संग्रहालय तयार केले.

श्रीमंत विजयसिंहराजे यांना स्वत:चे संतान नव्हते, राजेशाही वंशाच्या परंपरेनुसार त्यांचे धाकटे बंधू श्रीमंत जयसिंहराजे हे गादीवर बसले आणि अक्कलकोटचे राजेसाहेब झाले. श्रीमंत जयसिंहराजे भोसले यांनी त्यांनी भारत सरकारच्या ध्येय धोरणास सक्रीय सहकार्य केले. स्टेट बँक, भूविकास बँक, खादी ग्रामोद्योग, खरेदी विक्री संघ, टेलिफोन ऑफिस, पंचायत समिती, तसेच सरकारी ऑफिसना अल्प भाड्यात स्वतःच्या जागा देऊन सहकार्य केले. श्रीमंत जयसिंहराजे यांना फक्त दोन मुली होत्या, मुलगा नव्हता.

अक्कलकोटचे राजेसाहेब श्रीमंत जयसिंहराजे भोसले यांच्या पत्नी श्रीमंत मृदुलाराजे राणीसाहेब,  यांचा शैक्षणिक क्षेत्रात भरीव योगदान होते. अक्कलकोटमध्ये उच्च शिक्षणासाठी महाविद्यालय असावे, अशी त्यांची इच्छा होती. त्यांनी अक्कलकोट एज्युकेशन सोसायटीची स्थापना केला आणि संस्थेला १३ एकर जमीनही दान दिला. आज या १३ एकर जागेवर एक भव्य इमारत उभी आहे आणि महाविद्यालय उत्तम प्रकारे चालू आहे. प्रगतीच्या मार्गावर आहे.

श्रीमंत मृदुलाराजे राणीसाहेब यांनी स्वतःचे श्री मुरलीधर मंदिर व त्याचे जवळचे परिसर श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिराला दान केला. याशिवाय श्री स्वामी समर्थ महाराजांच्या भक्त कै. कलादगी महाराज यांचे विनंतीनुसार त्यांने २ एकर जागा दान दिली. १० डिसेंबर १९८५ रोजी श्रीमंत मृदुलाराजे राणीसाहेब यांचे आजारपणाने निधन झाले.

१९६५ मध्ये श्रीमंत जयसिंहराजे राजेसाहेबांच्या निधनानंतर, त्यांचे स्वतःचे किंवा दत्तक मुलगा नसल्यामुळे, त्यांची मोठी मुलगी, श्रीमंत राजकुमारी संयुक्तराजे, गादीवर बसली. श्रीमंत संयुक्ताराजे भोसले अक्कलकोट एज्युकेशन सोसायटीचे प्रमुख होत्या. त्यांनी शैक्षणिक उपक्रमांमध्ये सक्रिय योगदान दिले.

जुन्या राजवाड्यात श्रीमंत फत्तेसिंह III महाराज यांनी एक संग्रहालय स्थापन केले . संग्रहातील शस्त्रे धूळ आणि आर्द्रतेमुळे खराब होण्याची शक्यता होती. त्यांची सुरक्षितता आणि जतन सुनिश्चित करण्यासाठी मोठ्या प्रयत्नाने, श्रीमंत राजकुमारी सुनिताराजे यांनी सर्व शस्त्रे आणि इतर कलाकृती नवीन राजवाड्यात स्थलांतरित करून, काळजीपूर्वक त्यांची स्थिती राखून संपूर्ण संग्रह पुन्हा जिवंत केला. याव्यतिरिक्त, त्यांने खेडणीचे गाड्या  आणि खेडणीचे कुत्रे यासारख्या नवीन वस्तू जोडल्या, एकूण व्यवस्था सुधारली. त्यांच्या समर्पित प्रयत्नांनी संग्रहालयाचे पुनरुज्जीवन झाले. २०१९ मध्ये त्यांचे मृत्यू झाले, त्यांनी लग्न केला नाही.

श्रीमंत संयुक्ताराजे भोसले यांनी २००५ मध्ये कुर्ला घराण्यातील अॅड. श्री जयाजीराव राजे भोसले यांचे पुत्र मानाजीराव राजे भोसले यांना दत्तक घेतले आणि त्यांचे नाव श्रीमंत मालोजीराजे III संकुक्तराजे भोसले असे ठेवले. २०१८ मध्ये त्यांचे मृत्यू झाले. त्यानंतर श्रीमंत मालोजीराजे तिसरे यांचा राज्याभिषेक झाला आणि ते सध्याचे अक्कलकोटचे राजसाहेब आहेत. ते सध्या अक्कलकोटच्या नवीन राजवाड्याचे आणि इतर वारसा मालमत्तांचे नूतनीकरण करत आहेत.अक्कलकोटच्या पायाभूत सुविधांसह समग्र सामाजिक, आर्थिक विकासावर त्यांचा भर आहे.

फत्तेहसिंह महल

नवीन पॅलेस हे संयुक्त “डोरिक” आणि “कोरिंथियन” स्थापत्याचा एक शानदार नमूना आहे, ज्यात पोर्च आणि चारही बाजूंनी वाचलेजाणारे घड्याळांसह एक टॉवर आहे. पॅलेस मागे शाही घराण्याने एकेकाळी वापरलेले आऊटहाऊस आणि बंगले आहेत.

फत्तेहसिंह महल एक्सप्लोर करा

Explore Akkalkot

Old Palace

Armory Museum

Akkalkot Swami Samarth Maharaj Mandir

Vata Vruksha Mandir

Khandoba Mandir

Datta Mandir

Short Description of the image- when it was taken, year, etc

View all attractions

अक्कलकोट राज्याचा मोनोग्राम "सत्यमेव जयते" आहे.

राज्याचे ब्रीदवाक्य, स्वतंत्रतानंतर भारत सरकारने अंगीकृत केले. “सत्यमेव जयते” चा अर्थ “सत्याचा नेहमी विजयी होतो”